!!! वीर सावरकर वाचनालय !!!

आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना चांगल्या प्रकारचे साहित्य वाचावयास मिळावे व त्या दृष्टीने संस्थेचे वाचनालय असावे अशी सर्वांची इच्छा होती. त्यासाठी स्वतंत्र जागेची आवश्यकता होती. ब्राह्मण सोसायटीने त्यांचे कार्यालयाची जागा विनामोबदला देऊ केली आणि वाचनालयाची कल्पना साकार होऊ शकली. कविवर्य श्री. म. पां. भावे यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख पाहुणे म्हणून कै. श्याम फडके यांच्या उपस्थितीत दिनांक २१. ४. १९८९ रोजी वीर सावरकर वाचनालय सुरु झाले.

१९९२-९३ साली शासकीय मान्यता प्राप्त झालेल्या वीर सावरकर वाचनालयात अनेक पुस्तक प्रदर्शने भरवण्यात येतात. संस्थेस अनेक रसिकांकडून देणगीद्वारे, पुस्तकरूपाने किंवा वस्तुरूपाने सहकार्य मिळत असते. वाचनालयाच्या उभारणीत श्रीमती येसूताई पेंडसे यांचे मोलाचे योगदान आहे; तसेच मुंबई विश्वविद्यालयाच्या निवृत्त सहाय्यक ग्रंथपाल सौ. वसुधा परांजपे यांचेही अनमोल मार्गदर्शन लाभले होते.

अल्पावधीतच वाचनालय नावारूपाला आले असून कालांतराने संस्थेच्या नवीन वास्तूत स्थलांतरित झाले आहे. आजमितीस, पाचशेच्या वर सदस्य संख्या असलेल्या वाचनालयात जवळपास दहा हजारच्या वर पुस्तके, १००-१२५ मासिके व अनेक नामांकित वृत्तपत्रे आहेत.